नवी दिल्ली – मल्टीबॅगर स्टॉक तैनवाला केमिकल अँड प्लास्टिकच्या शेअर्समध्ये तब्बल १५ टक्क्यांची तीव्र वाढ सुमारे तीन महिन्यांनंतर पहायला मिळाली आहे. गेल्या एका वर्षात तैनवाला केमिकल अँड प्लास्टिकने २४ टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. मार्च २०२५ मध्ये या शेअरने २४४ रुपयांपर्यंत उच्चांक गाठला होता आणि आता त्याने २४६ रुपयांचा नविन उच्चांक गाठला आहे.
शेअर बाजार २१ जुलै रोजी घसरणीसह उघडल्यानंतर आता जोरदार तेजीने व्यवहार करत आहे. या बाजारातील झपाट्याने झालेल्या उलटफेरात केमिकल आणि प्लास्टिक तयार करणाऱ्या एका कंपनीच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांपर्यंत उसळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे तब्बल तीन महिन्यांनंतर तैनवाला केमिकल अँड प्लास्टिकच्या शेअर्समध्ये अशी झपाट्याने वाढ झाली आहे. मार्च २०२५ मध्ये या शेअरने २४४ रुपयांचा उच्चांक गाठला होता आणि आता त्याने २४६ रुपयांचा उच्चांक मोडला आहे. सध्या हा शेअर २३८.७० रुपयांवर व्यवहार करत आहे.
गेल्या वर्षभरात तैनवाला केमिकल अँड प्लास्टिकने २४% पेक्षा अधिक परतावा दिला आहे. सुमारे २२० कोटी रुपयांच्या मार्केट कॅप असलेली ही कंपनी प्लास्टिक शीट्सच्या उत्पादनात कार्यरत असून, कमोडिटी आणि शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायातही सहभागी आहे.
1 लाखाचे झाले 1 करोड 21 लाख
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2002 मध्ये 1.95 पैसे प्रमाणे 1 लाखाचे शेअर्स खरेदी केले असते तर त्यावेळी 51282 शेअर्स आले असते. ते शेअर्स आज पर्यंत तसेच ठेवले असते आणि आजच्या मितीला त्याची किंमत 237 रुपये प्रती शेअर्स प्रमाणे आज 1 करोड 21 लाखांच्या आसपास झाले आहे.
साडे सहा लाख शेअर्सचा ट्रेडिंग व्हॉल्युम
या मायक्रोकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये नेहमीसारखा सरासरी ट्रेडिंग व्हॉल्युम सुमारे २०,००० शेअर्सचा असतो, मात्र २१ जुलै रोजी या शेअरमध्ये सुमारे ६.५ लाख शेअर्सचा व्यापार झाला. तैनवाला केमिकलचा शेअर २१२.३० रुपयांवर उघडला आणि त्यानंतर २४६.८० रुपयांचा उच्चांक गाठला.
त्याचवेळी, मागील ५ वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने ३५०% पेक्षा अधिक परतावा दिला आहे, तर दीर्घकालीन कालावधीत हा परतावा ९०००% पेक्षा अधिक असल्याचे नोंदवले गेले आहे.
(सूचना: वरील शेअर्सबाबत दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीसाठी असून, ती गुंतवणुकीची शिफारस करत नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असल्याने, कोणतीही गुंतवणूक करण्याआधी प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)