मुंबई – राज्यातील वीज थकबाकीदार आणि बेकायदेशीर वीज वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीत महावितरण आहे. विजेची मागणी सध्या स्थिर असली तरी वाढती थकबाकी ही कंपनीच्या महसूलासाठी गंभीर अडचण बनली आहे. या पार्श्वभूमीवर, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना वसुली मोहिमेला वेग देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
राज्यात पावसाळी वातावरण असून विजेची मागणी नियंत्रणात आहे. त्यामुळे सध्या पुरेसा वीजपुरवठा सुरू आहे. मात्र वीज खंडित होण्याच्या वाढत्या तक्रारींमुळे महावितरणने ग्राहक सेवा आणि महसूलवाढ या दोन्ही मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी नुकतीच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी उपाय
पुण्यासह कोल्हापूर व बारामती परिमंडलाची स्वतंत्रपणे आढावा बैठक झाली. यावेळी संचालक सचिन तालेवार, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे, मुख्य अभियंता धर्मराज पेठकर आणि स्वप्नील काटकर उपस्थित होते.
बैठकीत वीज बिल वसुली, वीजचोरी रोखण्यासाठी उपाययोजना आणि ग्राहकांना अखंड वीजपुरवठा यावर चर्चा झाली. बैठकीत लोकेश चंद्र यांनी वीजचोरी रोखण्यासह थकबाकी वसुलीसाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, असा आदेश अधिकाऱ्यांना दिला.
त्याचबरोबर महसूल वाढीच्या दृष्टीने नवीन ग्राहकांना प्राधान्याने वीजजोडणी देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
पुणे विभागात १५ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा बंद
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे प्रादेशिक विभागात वीजबिलाची थकबाकी वसूल न केल्यामुळे सुमारे १५ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. हे प्रमाण गंभीर असून, या प्रकरणांची विभागनिहाय तपासणी सुरू आहे.
लोकेश चंद्र यांनी स्पष्टपणे आदेश दिले आहेत की, वीजचोरी आणि बेकायदेशीर वीजजोडण्या आढळल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई केली जावी.
ग्राहकांनी पुढाकार घेऊन वीजबिल भरा
महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी विविध ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरावे आणि सेवेत खंड न येऊ देण्यासाठी सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन बिल भरण्याची प्रक्रिया :
महावितरणचे मोबाईल ॲप, तसेच PhonePe, Google Pay, Paytm यांसारख्या ॲप्सद्वारे देखील वीजबिल भरणे शक्य आहे.
स्टेप्स 1 : महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
“ग्राहक पोर्टल”(Consumer Portal) ऑप्शन वर क्लिक करा.
“Online Bill Payment” किंवा “वीजबिल भरणा” पर्याय हा निवडा.
स्टेप्स 2 : तुमचा ग्राहक नंबर(consumer number) आणि इतर आवश्यक माहिती भरा.
तुम्ही भरणा करू इच्छित असलेल्या महिन्याचे बिल निवडा.
स्टेप्स 3 : पेमेंट पर्याय निवडा
तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI (Google Pay, PhonePe, Paytm इ.) यांसारख्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकता.
स्टेप्स 4 : पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा:
तुमचा पेमेंट ऑप्शन निवडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँकेच्या किंवा पेमेंट गेटवेच्या पेजवर रीडायरेक्ट केले जाईल.
तुमची पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक माहिती भरा आणि पेमेंट करा.
स्टेप्स 5 : पेमेंटची पावती जतन करा:
पेमेंट पूर्ण झाल्यावर, तुम्हाला एक पावती (receipt) जनरेट करुन मिळेल.
तुम्ही ती पावती जतन करून ठेवा.
पेमेंट झाल्यावर पावती प्राप्त होईल, ती सुरक्षित ठेवा.
DISCLAIMER – ही बातमी विविध माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या माहितीस आधारे तयार करण्यात आली आहे. वीजबिल भरणा, वीजजोडणी किंवा वीजपुरवठा संबंधित कोणतीही अधिकृत प्रक्रिया, नियम किंवा निर्णय महावितरणकडून वेळोवेळी अद्ययावत केले जातात. त्यामुळे ग्राहकांनी नेहमी अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in चा जाऊन माहितीची खात्री करावी. बातमीत दिलेली माहिती ही जनजागृतीसाठी असून, कोणतीही अंतिम अथवा कायदेशीर जबाबदारी लेखक किंवा प्रकाशक यांची राहणार नाही.