मुंबई – सणासुदीच्या तोंडावर देशातील ई-कॉमर्स क्षेत्रात पुन्हा एकदा सवलतींचा महापूर येत असून, फ्लिपकार्टने ‘फ्रीडम सेल २०२५’ची घोषणा करत ग्राहकांच्या खरेदीसाठी मोठा मुहूर्त साधला आहे. स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू आणि वैयक्तिक उपयोगाच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलती देण्याचा निर्धार फ्लिपकार्टने केला असून, सेलच्या तारखा आणि ऑफर्सवर ग्राहकांचे लक्ष लागून राहिले आहे.
१ ऑगस्टपासून सेलची सुरुवात
फ्लिपकार्टच्या मोबाइल अॅपवर मिळालेल्या माहितीनुसार ‘फ्रीडम सेल’ १ ऑगस्टपासून सुरू होईल, तर अधिकृत वेबसाइटवर २ ऑगस्टपासून सुरू होण्याचा उल्लेख आहे. दोन्ही मधील विसंगती लक्षात घेता, कंपनीकडून याबाबत लवकरच स्पष्टता दिली जाणार असल्याची शक्यता आहे.
फ्लिपकार्ट प्लस आणि व्हीआयपी वापरकर्त्यांना वशिला
फ्लिपकार्टच्या प्लस व व्हीआयपी ग्राहकांना या सेलमध्ये २४ तास आधी खरेदीची संधी मिळणार आहे. याचबरोबर सुपर कॉइन्स वापरल्यास १० टक्क्यांची अतिरिक्त सूट, तर निवडक बँक कार्ड्सवर १५ टक्के तात्काळ सवलत मिळू शकते. विशेषतः iPhone, Samsung आणि Nothing या कंपन्यांचे स्मार्टफोन या सेलमध्ये भरघोस सूट मिळण्याच्या शक्यतेने चर्चेत आले आहेत.
७८ प्रोमो ऑफर्स, ग्राहकांच्या उत्सुकतेला उधाण
या सेलमध्ये फ्लिपकार्टकडून एकूण ७८ वेगवेगळ्या प्रोमो ऑफर्स देण्यात येणार आहेत. ‘Freedom Deals’ अंतर्गत सर्वाधिक सूट दिली जाईल, ‘Rush Hours’ या वेळेस मर्यादित काळासाठी निवडक वस्तूंवर विशेष ऑफर्स असतील, तर ‘Tick Tok Deals’ प्रत्येक तासाला नव्या सवलतीसह उपलब्ध होतील. याशिवाय ‘Exchange Offers’ आणि ‘Bumper Hours’ या ऑफर्सद्वारे ग्राहकांना जुन्या वस्तूंना मोबदला मिळवण्याची व उच्च मागणी असलेल्या वस्तूंवर चांगली सूट मिळण्याची संधी असेल.
कुठे आणि कसे खरेदी कराल?
फ्लिपकार्टचा अॅप, अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत स्टोअर्समधून ग्राहक या सेलचा लाभ घेऊ शकतात. प्लस सदस्य नसलेले ग्राहक देखील सदस्यत्व घेऊन ‘अर्ली अॅक्सेस’ मिळवू शकतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी, कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करून खरेदी करण्याचा मोह टाळावा; केवळ अधिकृत स्रोतांचाच वापर करावा.
विविध श्रेणीतील वस्तूंवर सूट
या सेलमध्ये iPhone, Motorola, Oppo, Samsung, Nothing, Poco, Vivo आणि Realme यांसारख्या ब्रँड्सच्या मोबाईल्सवर मोठी सूट मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स विभागातही बऱ्याच वस्तू ग्राहकांना स्वस्तात मिळणार आहेत.
उदाहरणादाखल, Samsung चा ५५ इंच 4K टीव्ही ४० हजार रुपयांच्या आत, Samsung 330 लिटर फ्रिज अवघ्या ३X,४९० रुपयांत आणि Samsung 9 किलो वॉशिंग मशीन फक्त २X,९९९ रुपयांत मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच संपलेल्या GOAT सेलच्या धर्तीवर फ्रीडम सेल
फ्लिपकार्टचा ‘GOAT सेल’ नुकताच संपला असून, त्या सेलमध्ये iPhone 16, Nothing Phone 3a Pro आणि Samsung Galaxy S24 यांसारख्या डिव्हाइसेसवर भरघोस डील्स मिळाल्या होत्या. आता ‘फ्रीडम सेल २०२५’ त्याच्या पाठोपाठ सुरू होणार असल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Amazon आणि Meeshoही तयार
फ्लिपकार्टचा हा सेल सुरू होत असतानाच, Amazonचा ‘Freedom Indian Festival Sale’ देखील १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दोन्ही कंपन्यांनी अद्याप त्यांच्या सेलच्या समाप्तीची तारीख जाहीर केलेली नसली, तरी ग्राहकांसाठी हे काही दिवस खरेदीचे सुवर्णक्षण ठरणार आहेत.
ग्रामीण भागालाही डिलिव्हरीची हमी
यंदा फ्लिपकार्टने डिलिव्हरी नेटवर्क ग्रामीण भागातही विस्तारले असून, लहान शहरांतील व गावातील ग्राहकही सेलमधील सवलतींचा लाभ घेऊ शकतील. जलद डिलिव्हरीसाठी कंपनीने लॉजिस्टिक सेवा सुधारली आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. मोबाईल, घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन यांसारख्या विविध क्षेत्रांत स्वस्त खरेदी करायची असल्यास, फ्लिपकार्ट फ्रीडम सेल २०२५ चा लाभ घ्यायलाच हवा.